महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday 23 December 2024
.mahanewsonline.com
कुंभमेळ्यात कोरोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन
एकीकडे देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे हरिद्वारमध्ये कोरोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसून आले. कुंभमेळ्यासाठी आलेल्या भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यावेळी करण्यात आलं नाही.
शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी गंगा नदीत स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचं जाहीरपणे हे उल्लंघन होतं.
देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून गेल्या २४ तासांत दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या कोरोनाच्या संकटात पार पडत आहे. कुंभमेळ्यासाठी सर्व नियमांचं पालन केलं जात असलं तरी तज्ञांनी गर्दी करु नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.