top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मोदी सरकारचं लोकसभेत स्पष्टीकरण

कोणत्याही देशातील सरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलेलं नाही. मात्र, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांमधील भारतीय वंशाच्या काही व्यक्तींनी या कायद्याला विरोध केल्या असल्याचं केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेमध्ये म्हटलं आहे. सरकारने म्हटलं आहे. तत्पूर्वी आयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलीली यांनी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या देशांची यादी असेल तर ती सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना ही माहिती सरकारने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं होतं. तसेच अमेरिकन पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी केलेले ट्विट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपप्रचार करण्याचा डाव आहे. सेलिब्रिटींकडून केली जाणारी वक्तव्य ही योग्य आणि जबाबदार नाहीत, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

classi 2.jpg
bottom of page