top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

राम मंदिरासाठी जमा झाला अडीच हजार कोटींचा निधी!

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतभरातून जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानं घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जर कोणाला देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. आतापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

classi 2.jpg
bottom of page