top of page
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday 23 December 2024
.mahanewsonline.com
रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी!
क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक असून, यासंदर्भात धवल कुलकर्णीने आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. सोमवारी सायंकाळी मुंबईमध्ये या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. धवल कुलकर्णीने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिला. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.
bottom of page