महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday 23 December 2024
.mahanewsonline.com
शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे...
“मी उदयनराजेंविरोधात विधानसभा निवडणूक लढवून आलेला माणूस आहे, समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही” असं म्हणत साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. आ. शिवेंद्रराजे भोसले हे शांत आणि संयमी स्वभाव म्हणून सर्वांना परिचित आहे. मात्र जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील एका कार्यक्रमात त्याचा अनोखा अवतार पाहायला मिळाला.
“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्याचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.