top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. 27 मे रोजी एनसीबीने मोठी कारवाई करत सिद्धार्थ पिठाणी याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला 4 जूनपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. सिद्धार्थ पिठानीला आज कोर्टात हजर केलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सिद्धार्थ पिठानीने आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

classi 2.jpg
bottom of page