top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वेंच्या भीषण धडकेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. यात ३० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो जखमी झाले. सर सय्यद एक्स्प्रेस रेल्वे गाडीने धडक दिल्यानं मिल्लत एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली. रेती आणि डहार्की रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं. मृत आणि जखमी प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात गावकऱ्यांनी मदत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघातांचं कारण कळू शकलेलं नाही.

classi 2.jpg
bottom of page