top of page
Writer's pictureMahannewsonline

७९ चेंडूत १७ चौकार,१७ षटकारांसह २०५ धावा

दिल्लीच्या रणजी संघातून खेळणाऱ्या सुबोध भाटीची दमदार कामगिरी

क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते असे म्हणतात. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूत २६४ धावा करत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता असाच काहीसा पराक्रम दिल्लीच्या सुबोध भाटीने केला आहे. सुबोधने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकत सर्वांचा लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुबोधने २०५ धावांची नाबाद खेळी केली.

एका क्लब टी-२० सामन्यात खेळत सुबोधने द्विशतक ठोकले. या खेळीत त्याने १७ षटकार आणि १७ चौकार लगावले. सुबोधने सलामीला जाऊन ७९ चेंडूत २०५ धावांची नाबाद खेळी केली. दिल्ली इलेव्हन संघाकडून खेळताना त्याने सिंबा संघाविरूद्ध हा पराक्रम केला. सुबोध भाटीच्या द्विशतकाच्या जोरावर त्याच्या संघाने २० षटकांत २ गडी गमावून २५६ धावा केल्या. दिल्ली इलेव्हनच्या २५६ धावांचा पाठलाग करताना सिंबा संघ १८ षटकात १९९ धावाच करू शकला.

यापूर्वीही सुबोध भाटीने २०१८ मध्ये टी -२० सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने ५७ चेंडूत २१ षटकार आणि १३ चौकारांसह २०७ धावा केल्या. दुसरीकडे, २००७ मध्ये इंग्लंडमध्ये लँकशायरच्या सॅडलवर्थ लीगमध्ये ऑस्टरलँड्सकडून खेळताना श्रीलंकेच्या धनुका पाथिराणाने ७२ चेंडूत २७७ धावा केल्या होत्या. पाथिरानाने त्याच्या खेळीत २९ षटकार आणि १८ चौकार लगावले होते.


bottom of page