top of page
Writer's pictureMahannewsonline

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तरुणाने केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात तो रहात होता. निखिलने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे असं पत्रात निखिल धोत्रेने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.


bottom of page