top of page
Writer's pictureMahannewsonline

विद्यापीठातील नाट्य रंगमंचाचे शनिवारी उद्घाटन

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ललितकला व कला संकुलाची निर्मिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून झाली आहे. यात नाट्य कलावंतांना कला सादरीकरणासाठी चांगल्या दर्जाचे नाट्य रंगमंच उभारण्यात आले असून याचे उद्घाटन शनिवार, दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.


मागील दोन वर्षांपासून सुरू झालेल्या ललितकला व कला संकुलात नाट्य, संगीत आणि तबला विभाग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच डिप्लोमा अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तिन्ही विभागाच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. एम. ए. तबला अभ्यासक्रमास अमेरिकेतील तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त चांगल्या दर्जाचे रंगमंच विद्यापीठात उभारण्यात आले आहे. यामध्ये सर्व वाद्य, लाईट, इतर सर्व आवश्यक बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकांकिका, नाट्य सादरीकरणासाठी चांगले रंगमंच उपलब्ध झाले आहे. या रंगमंचाचे उद्घाटन दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ललितकला व कला संकुलाच्या प्रभारी संचालिका डॉ. माया पाटील यांनी दिली. उद्घाटनानंतर ललित कला संकुलातील विद्यार्थी व शिक्षकांचा एकांकिका सादरीकरण व गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

bottom of page