top of page
Writer's pictureMahannewsonline

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीला हैदराबादमधून अटक केली आहे. लवकरच सिद्धार्थला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? असा प्रश्न उभा राहत आहे. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली केली होती. या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीेने ड्र्ग्स पुरवल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती. सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. मितू आणि प्रियंका यांना 14 तारखेला फोनवर सुशांतच्या आत्महत्येबाबत माहिती दिल्याचा दावा सिद्धार्थ पिठानीने केला होता. प्रियंका आणि मितू यांच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचे देखील सिद्धार्थने सांगितले होते. दीपेशने चाकूने पंख्याला लागलेला दोर कापला होता, तर आपण मृतदेह खाली काढला, असे सिद्धार्थने सीबीआयला सांगितले होते





bottom of page