top of page
Writer's pictureMahannewsonline

कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसांच्या ताब्यात; सीसीटीव्ही फुटेजही सापडले

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील छात्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय पैलवान सागर राणा याची हत्या झाली होती. सागर राणा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचं नाव समोर आल्यानंतर सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्यानंतर तो फरार झाला होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले.

५ मेपासूनच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. याप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार आपल्या साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना करत असल्याचं दिसत असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबनेही हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलेलं आहे.


bottom of page