top of page
Writer's pictureMahannewsonline

शेफालीची धमाकेदार खेळी; 7 चौकार आणि 5 षटकारांसह केल्या 60 धावा

आयसीसी जागतिक महिला टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन टी ट्वेन्टी सामन्यात झालेल्या पराभवानंतर शेवटच्या टी ट्वेन्टीमध्ये आफ्रिकेला मात देण्याच्या इराद्यानेच उतरलेल्या भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने दणदणीत पराभव केला. 17 वर्षीय फलंदाज शेफाली वर्माने कर्णधार स्मृती मंधानाच्या साथीने 11 ओव्हर्समध्ये भारताला विजय मिळवून दिला. शेफालीने 30 चेंडूत तिने 60 धावांची धमाकेदार खेळी केली. यातले 58 रन्स तर तिने केवळ 12 चेंडूत केले. त्यामुळे तिच्या नावाची दहशत आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये पसरलीय. त्याबरोबरच शेफालीने आयसीसी जागतिक महिला टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत क्रमांक एकचं स्थान पटकाविले आहे.


दक्षिण आफ्रिकेचा संघ राजेश्वरी गायकवाडच्या फिरकीसमोर मैदानावर जास्तवेळ तग धरू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेला केवळ 112 धावाच काढता आल्या. त्यानंतर 17 वर्षीय फलंदाज शेफाली वर्माने कर्णधार स्मृती मंधानाच्या साथीने 11 ओव्हर्समध्ये भारताला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये तिने दणदणीत अर्धशतक ठोकलं. 30 चेंडूत तिने 60 धावांची आतिषी खेळी खेळली. यातले 58 रन्स तर तिने केवळ 12 चेंडूत केले. शेफालीने आपल्या खेळीला 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. . शेफालीने या सिरीजमध्ये सर्वाधिक रन्स केले. त्यामुळे तिला प्लेअर ऑफ सिरीजचा पुरस्काराचा मान देण्यात आला.


आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या महिलांच्या जागतिक टी -२० क्रमवारीत शेफाली वर्माने पुन्हा एकदा क्रमांक एकचं स्थान पटकावलंय. वयाच्या 17 व्या वर्षी दुसर्‍या वेळी या क्रमांकावर पोहोचणारी ती जगातील एकमेव खेळाडू आहे. टी -20 महिला विश्वचषकात केलेल्या कामगिरीनंतर तिने जागतिक टी -२० क्रमवारीत क्रमांक एकचं स्थान पटकावलं होतं. आता पुन्हा एकदा शेफालीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला मागे टाकत 750 गुण मिळवून हे कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज मूनीच्या खात्यात 748, न्यूझीलंडच्या डेव्हीनच्या खात्यात 716 गुण आहेत. भारताची स्मृती मानधाना 677 गुणांसह सातव्या आणि जेमीमा रॉड्रीग्ज 640 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.


bottom of page