top of page

राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार... : सुजय विखे-पाटील

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार निवडणुकीच्या रणांगणात होते. पण त्यांचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा दावा भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

"राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अपक्षांमुळे नाही तर राष्ट्रवादीच्या खेळीमुळे झालाय. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहे. माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय", असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रिया म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं. याचा विचार शिवसेनेने करणं गरजेचं आहे", असंही सुजय विखे पाटील म्हणाले.



bottom of page