top of page
Writer's pictureMahannewsonline

समीर वानखेडेंना पुन्हा मुदतवाढ, आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी

मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर घातलेल्या छाप्याचं नेतृत्व करणारे अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे वानखेडे पुढील सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी राहतील. वानखेडे यांना देण्यात आलेली ही दुसरी मुदतवाढ आहे.

कोण आहेत समीर वानखेडे ?

समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. समीर वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. 2011 मध्ये सोन्याने मढवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती.



bottom of page