top of page
Writer's pictureMahannewsonline

समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला!

मुंबई : क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह तीन जणांना अटक केली होती. या कारवाईवर संशय व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर टीका करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता एनसीबीनं आज मोठा निर्णय घेतला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाकडे आर्यन खानसह आणखी पाच प्रकरणांचा तपास वर्ग करण्यात आला आहे. एनसीबीचे दिल्लीतील पथक शनिवारी मुंबईत पोहोचणार असून पुढील तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीट करत " ही तर फक्त सुरुवात आहे," असा इशारा दिला आहे. “समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.


bottom of page