top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर... तरीही भीक मागून पोट भरावे लागते...

कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर असूनही रस्त्यावर भीक मागून पोट भरणाऱ्या एका महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ती महिला फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. शारदा अवनिश त्रिपाठी नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून शारदा त्रिपाठी यांनी सदर महिलेला मदत करण्याचे आवाहनही केलं आहे,

या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव स्वाती आहे. ती वाराणसीच्या अस्सी घाटावर राहते. तीन वर्षांपूर्वी ती वाराणसीला आली होती. स्वाती भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असली तरी ती सुशिक्षित आहे. ती कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहे. एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीराची डावी बाजू पॅरालाइज्ड झाली. आपलं पोट भरण्यासाठी तिला भीक मागावी लागते.

आपल्याला पैस नको पण काम मिळवून द्या, असं ती म्हणते. चांगली नोकरी मिळावी आणि चांगलं आयुष्य जगायला मिळावं, अशी इच्छाही स्वातीने व्यक्त केली आहे. स्वाती टायपिंग आणि संगणकाशी संबंधित इतर कामे करू शकतात. ती इंग्रजी अस्खलित बोलू शकते. असं या पोस्टमध्ये म्हंटल आहे.


bottom of page