top of page
Writer's pictureMahannewsonline

T20 वर्ल्डकप : अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्याअगोदर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. भारताने स्कॉटलंडला पराभूत करण्याबरोबरच आपल्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा केलीय.त्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आशा अद्यापही कायम आहे. मात्र न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या होणाऱ्या सामन्यावर भारताचे भवितव्य अवलंबून असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे असून सोशल मीडियावर एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला तर भारतासाठी आशेचा किरण कायम राहिल. मात्र, यास्थितीत उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अफगाणिस्तानचीही दावेदारी राहील. भारताला आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी नामिबिया विरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल तरच नेट रन रेटच्या आधारावर भारत उपांत्या फेरी गाठू शकेल.


bottom of page