top of page
Writer's pictureMahannewsonline

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टी-२० वर्ल्डकप भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे.

आज शुक्रवारी ओमानमध्ये झालेल्या बैठकीत कोणकोणते संघ कोणत्या गटात असणार, हे निश्चित करण्यात आले. यात गट-२ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २०१९ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता. लवकरच टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.


bottom of page