top of page
Writer's pictureMahannewsonline

तालिबानकडून १५० नागरिकांचं अपहरण? भारतीय नागरिकांचाही समावेश ; तालिबाननं केलं खंडन

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर सर्वच देशांनी आपापल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच १५० नागरिकांना काबूल विमानतळाजवळून तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असल्याची बातमी समोर येत आहे. यात बहुतांश भारतीयांचा समावेश आहे, अफगाणिस्तानच्या माध्यमांनी याबाबतचं वृत्त प्रसारित केलं असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. भारताकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर तालिबानी प्रवक्त्याने या वृत्ताचं खंडन केलं असून भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या काबुल विमानतळाच्या आत सोडण्यात आलं असल्याचा दावा केला आहे.

परराष्ट्र मंत्रालय याबाबत अधिक माहिती घेत असून प्रतिक्रिया देण्यास मंत्रालयाने नकार दिला आहे. काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.



bottom of page