top of page
Writer's pictureMahannewsonline

तालिबानने दिला अमेरिकेला इशारा

तालिबानने अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबान आणि अमेरिका यांच्यात काल चर्चा झाली. या चर्चेदरम्यान " अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये," असा स्पष्ट इशारा तालिबानने दिला आहे.

कतारची राजधानी दोहामध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकीने 'बख्तर' या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलंय की, “अफगाणिस्तानमधील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचंही चांगलं होणार नाही, अंस आम्ही अमेरिकेला स्पष्टपणे सांगितलंय. अफगाणिस्तानसोबत चांगले संबंध असणं हे सर्वांसाठी चांगलं असेल. अफगाणिस्तानमधील सध्याचे सरकार कमकुवत करण्यासाठी कोणी काहीही करू नये, ” अशा शब्दात अप्रत्यक्षपणे तालिबानने अमेरिकेला इशारा दिला आहे.


bottom of page