top of page
Writer's pictureMahannewsonline

आता अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाता येणार नाही...

तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दररोज वेगवेगळे आदेश देत आहेत. मंगळवारी तालिबान्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितलं की, यापुढे अफगाण नागरिकांना आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळाकडे जाणारा रस्ता अफगाण नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, इतर देशातील नागरिक ह्या रस्त्याने जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आल्याचं वृत्त सीएनएनने दिले आहे.


bottom of page