top of page
Writer's pictureMahannewsonline

तालिबानची पहिली पत्रकार परिषद; जगाला काय सांगितले?

अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने काबुलमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महिलांवर कुठलेही अत्याचार आणि भेदभाव होणार नाही. इस्लामच्या आधारावर महिलांना त्यांचे अधिकार देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच अफगाणिस्तानपासून कोणत्याही देशाला धोका नाही, असंही तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी यावेळी सांगितलं.

या पत्रकार परिषदेत महिलांना शाळा आणि रुग्णालयांमध्ये काम करण्याची परवानगी असेल. इस्लामनुसार महिलांना अधिकार मिळतील आणि त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं तालिबानने स्पष्ट केलं. अफगाणिस्ताला त्यांच्या नागरिकांसाठी त्यांच्या मूल्यांनुसार योग्य असे नियम बनवण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा परिस्थितीत इतर देशांनी त्यांचा आदर केला पाहिजे. सर्वांचा समावेश असेल, असे सरकार आम्हाला अफागणिस्तानमध्ये स्थापन करायचे आहे. आम्हाला कुठलाही अंतर्गत किंवा बाह्य शत्रू नकोय. आमच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही सर्वांना माफ केलं आहे, असं जबीहुल्ला मुजाहिदने सांगितलं.

सर्व माध्यमांनी आपलं काम सुरू ठेवावं. पण कुठलेही प्रसारण हे इस्लामी मूल्यांविरोधात असू नये. त्यांनी निष्पक्ष असायला हवे. कुणीही असं काहीही प्रसारीत करू नये, जे देशाच्या हिताविरोधात असले, असं तालिबानने स्पष्ट केलं.


bottom of page