top of page
Writer's pictureMahannewsonline

तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ... असं म्हणत पत्नीला जबरदस्तीने पाजले कीटकनाशक

तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे बघायचं आहे, असं म्हणत आपल्याच पत्नीला कीटकनाशक पाजणाऱ्या पतीला अटक करण्यात आली आहे. तर पत्नीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे. हा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी घडला आहे.

यशवंत टंडन आणि उमा टंडन हे दांपत्य बेमेतरा (छत्तीसगड) जिल्ह्यात राहत होतं. घटनेच्या दिवशी उमा टंडन या स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी सकाळी १० वाजता त्यांचे पती यशवंत टंडन हे बाहेरून घरी आले. यशवंतने घरी येताच 'तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, असं त्यानं पत्नीला विचारलं. त्यावर पत्नीनं खूप प्रेम असल्याचं सांगितलं. यशवंतने प्रेम सिद्ध करून दाखव, असं पत्नीला म्हटलं. त्यावर नेमकं काय करू, अशी विचारणा पत्नीनं केली.

तेव्हा यशवंतने किचनमधून पत्नीला दुसऱ्या खोलीत नेलं आणि जबरदस्तीनं तिचं तोंड उघडून कीटकनाशक तोंडात घातलं. पत्नीने केलेला आरडाओरडा ऐकून शेजारी तिच्या घरी धावत आले. तिची अवस्था पाहून तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पतीवर कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.



bottom of page