top of page

बोगद्याचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले; बचाव कार्य सुरू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी मध्ये शनिवारी रात्री बोगद्याचा भाग कोसळल्याने ३६ मजूर अडकल्याची धक्कादायक घटना घडली. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या बोगद्याचा तब्बल ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, प्रशासनाने या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे.

उत्तराखंडातील उत्तरकाशीत यमुनोत्री महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांव पर्यंच्या बोगद्याचे काम सुरु असताना बोगद्याचा आतील भाग शनिवारी रात्री अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.


बोगद्यात अडकलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहेत. त्याचबरोबर एक ऑक्सिजन पाईपही बोगद्यात पोहोचवली आहे, अशी माहिती उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली.



bottom of page