top of page
Writer's pictureMahannewsonline

देशासाठी... "टाटा" चा मोठा निर्णय ; परदेशातून आणणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर टाटा ग्रुपने थेट परदेशातून मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे. टाटा समूहाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून टाटा समूहाचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. देश सध्या करोनाविरोधात देत असलेल्या लढ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आमचे हे प्रयत्न आहे, असं ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.


bottom of page