top of page
Writer's pictureMahannewsonline

भारतीय क्रिकेटपटूंना केवळ 'कोविशिल्ड' लस घ्यायचा सल्ला....

मुंबई : कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित करण्यात आल्याने भारतीय क्रिकेटपटू आपापल्या घरी आहेत. सध्याच्या घडीला खेळाडूंकडे मोकळा वेळ आहे. राज्य सरकारने कोरोना लसीकरणाला सुरुवात केली असून खेळाडू वैयक्तिकरित्या लस घेऊ शकतात. जे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत त्या खेळाडूंनी केवळ कोविशील्ड व्हॅक्सिन घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोविशिल्ड लस घेणं केवळ त्याच क्रिकेटपटूंसाठी आवश्यक आहे जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड मालिकेत भाग घेऊ शकतात. भारतीय खेळाडूंनी कोविशिल्डचा पहिला डोस भारतात घेतल्यास त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेता येईल. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाचं कोविशिल्ड हे प्रोडक्ट असल्याने इंग्लंडमध्ये असताना भारतीय खेळाडू कोविशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकतात.

कोविड 19 च्या लसीकरण मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना विषाणूच्या कोणत्याही लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. जर एखाद्याने कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तर त्यांना कोवॅक्सिनचाच दुसरा डोस घ्यावा लागेल. म्हणूनच भारतीय खेळाडूंना कोविशिल्ड लस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.



bottom of page