top of page
Writer's pictureMahannewsonline

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे.

टी २० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीम इंडियाला राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभणार आह. भारत न्यूझीलंड मालिकेदरम्यान राहुल द्रविड पदभार स्वीकारणार आहे. राहुल द्रविड २०२३ पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. दुसरीकडे पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने अनेक भूमिका बजावल्या आहेत. राजस्थान रॉयल्ससोबत खेळाडू आणि प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. तर इंडिया ए, एनसीएसोबत काम केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा एक सन्मान आहे आणि मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मला आशा आहे की ते पुढे नेण्यासाठी संघासोबत काम करेल. मी काही खेळाडूंसोबत इंडिया ए, अंडर-१९ आणि एनसीएमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास आनंद वाटेल. पुढच्या दोन वर्षात मोठ्या स्पर्धा आहेत. मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहे", असं राहुल द्रविडने सांगितलं आहे.


bottom of page