top of page
Writer's pictureMahannewsonline

उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत. चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. तर राजशिष्टाचारानुसार तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक नेते व केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणे यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी केल्याने राजकीय वाद रंगला होता. त्या पाश्र्वभूमीवर ९ ऑक्टोबरला काय होते याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी चिपी विमानतळाच्या तयारीचा आणि कार्यक्रमाचा आढावाही घेतला.


bottom of page