top of page

'सीरम'ला स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाची परवानगी

मुंबई : औषध नियामक मंडळाने सीरम इन्स्टिट्यूटला भारतात Sputnik V लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सीरमने स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनाची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. केंद्र सरकारने काही अटीशर्थींसह पुण्यातील हडपसर इथल्या प्रकल्पात सीरमला Sputnik V लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली असून सध्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रशियाच्या Sputnik V या लसीचं उप्तादन भारतात करत आहे. सीरमने या लसीच्या उत्पादनासाठी रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसह करार केला आहे.

bottom of page