top of page
Writer's pictureMahannewsonline

वाघाच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू ...

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून एका कामगाराला वाघाने उचलून नेले. बुधवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी त्या कामगाराचा मृतदेह डोकं धडावेगळं झालेल्या अवस्थेत सापडला आहे.. भोजराज मेश्राम असं मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

चंद्रपूर वीज केंद्रातील 'कुणाल एंटरप्राइजेस' या कंपनी मध्ये काम करणाऱ्या भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने बुधवारी रात्री उचलून नेले होते. तो काम आटोपून सायकलवरून दुर्गापूर येथे घरी परतत होता. त्यावेळी वाघाने 'कोल हँडलिंग प्लॅन्ट' परिसरात त्याच्यावर हल्ला चढविला होता. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. कामगाराचा मृतदेह आज (गुरुवारी) सकाळी मिळाला आहे.

वीज केंद्र परिसरातून मागील दोन दिवसापासून वाघ फिरत आहे. तशी माहिती वीज केंद्राने वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. त्या कामगाराची सायकल रस्त्यावर पडलेली दिसली, गेट नंबर १३ जवळ ही घटना घडली आहे. संबंधित कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता.

काही दिवसांपूर्वी पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेले होते. त्यानंतर हिराई विश्राम गृह जवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे.


bottom of page