top of page

ध्वजारोहणानंतर घरी परतताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात नेत्याचा जागीच मृत्यू

देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानां तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून घरी परतत असणाऱ्या एका नेत्याची चार जणांनी दिवसाढवळ्या हत्या केल्याची घटना घडली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया असं हत्या करण्यात आलेल्या नेत्याचं नाव आहे. या घटनेनंतर परिसरात वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी या भागामध्ये जमावबंदीचं कलम १४४ लागू केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलडारुपल्ली गावामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते तम्मिनेनी कृष्णैया हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपल्या बाईकने घराकडे निघाले होते. ते तेलदरुपत्ती गावाच्या हद्दीतून जात होते. त्याचवेळी एका ऑटो रिक्षामधून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की कृष्णैया यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात वाढला. त्यामुळे पोलिसांनी तेलदारुपल्ली गावामध्ये कलम १४४ लागू केला आहे. काही काळापूर्वीच तम्मिनेनी कृष्णैया यांनी सीपीएम सोडून टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.


bottom of page