top of page
Writer's pictureMahannewsonline

Tokyo Olympic - Hockey : अर्जेंटिनाला हरवून भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेटिनाचा साखळी फेरीमधील सामन्यात पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने अर्जेंटीनाविरुद्धचा सामना ३-१ च्या फरकाने जिंकला आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटीनाला धूळ चारलीय. अ गटाच्या साखळी फेरीतील भारताचा अंतिम सामना ३० जुलै रोजी जपानविरुद्ध होणार आहे.

या सामन्यामध्ये भारत आणि अर्जेंंटिना दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्याने पहिल्या व दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. पहिल्या ३० मिनिटांमध्ये एकाही संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली नाही. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरच वरुण कुमारने भारताकडून पहिला गोल करत सामन्यात भारतीय संंघाला १-० च्यी आघाडी मिळवून दिली.

अर्जेंटीनाने चौथ्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये आपला पहिला गोल केला. ४८ व्या मिनिटाला स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१ च्या बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला. भारताकडून ५८ व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करत भारताला २-१ ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी ३-१ वर नेली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


bottom of page