top of page
Writer's pictureMahannewsonline

बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत अडचण आल्यास 'या' मोबाईल क्रमांकावर तक्रार करा

कृषि मंत्र्याचे निर्देश; कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना खरीप हंगामात बियाणे, खते, व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठा बाबत अडचण येऊ नये यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सुचनेनुसार कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाच्या ई-मेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन कृषि संचालक, दिलीप झेंडे यांनी केले आहे.


या मोबाईल क्रमांकावर करु शकता तक्रार

नियंत्रण कक्षाचा controlroom.qe.maharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा

8446117500, 8446331750 व 8446221750 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून शेतक-यांना तक्रार दाखल करता येईल.


सबंधितांनी भ्रमनध्वनी , टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमंत, साठेबाजी, व लिकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवितांना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा किंवा सदर तक्रार को-या कागदावर लिहून त्याचा फोटा व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारीचे निरसन करणे सोईचे होईल. व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल तर तोंडी तक्रार नोंदवावी. असे कृषि विभागाने कळविले आहे.

bottom of page