top of page
Writer's pictureMahannewsonline

उस्मानाबादी शेळी आणि सानेन मेंढी दुधासाठी उपयुक्त

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना वाटप करण्याचा मानस

सातारा :- शेळी व मेंढी दूध आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून उपयुक्त असून उस्मानाबादी व सानेन या जातीच्या शेळींचे शेतकऱ्यांना संगोपनासाठी वाटप करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री केदार यांनी आज दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ,रणजितसिंह देशमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. सुरेश जाधव, एम. के. भोसले, विश्वंभर बाबर, अशोक आबा गोडसे, दादासाहेब काळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरिफ इनामदार, डॉ. बी. एन. मदने, डॉ चंद्रकांत खाडे, डॉ पांडुरंग येडगे आदी उपस्थित होते.

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर वाढीव निधी देण्यात येईल. तसेच पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली असून कामावर होणारा विपरीत परिणाम यापुढे होणार नाही. उस्मानाबादी व सानेन जातीच्या शेळींचे संवर्धन व विकास करण्यावर भर देण्यात येणार असून संगोपनासाठी शेतकऱ्यांना वाटपही करण्यात येणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान सांगितले.


bottom of page