top of page
Writer's pictureMahannewsonline

लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसतानाही....

देशभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. बहुतांश राज्यांत लशींचा तुटवडा जाणवू लागला असून, काही राज्यांनी थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून लस खरेदीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लस तुटवड्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आहे. केंद्र सरकारने लशींच्या साठ्याचा कुठलाही आढावा न घेता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणालाही परवानगी दिली. जागतिक आरोग्य संघटनेची नियमावलीही ध्यानात घेतली नाही ,” असं स्पष्ट मत सिरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका शिखर परिषदेत बोलताना मांडलं आहे.

सुरूवातीला ३०० मिलियन लोकांना लस दिली जाणार होती. त्यासाठी ६०० मिलियन डोसची गरज होती. आम्ही सुरुवातीच्या उद्देशापर्यंत पोहोचण्याआधीच केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण करण्याची आणि त्यानंतर १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही परवानगी देऊन टाकली. यासाठी लागणाऱ्या लशींचा साठा आपल्याकडे उपलब्ध नसल्याची माहिती असतानाही सरकारने ही परवानगी दिली. जागतिक आरोग्य संघटनेनं निर्धारित केलेली नियमावली समोर ठेवून त्यानुसार लसीकरणासाठी लोकांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा होता, असं जाधव यावेळी म्हणाले.


bottom of page