top of page
Writer's pictureMahannewsonline

... आरोग्य पथक आल्याचं पाहून गावकऱ्यांनी मारल्या नदीत उड्या

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असून देशभर लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच लस घ्यायची नसल्याने काही गावकऱ्यांनी चक्क शरयू नदीमध्ये उड्या मारल्या. उत्तर प्रदेशमधील सिसौंडा ( जि. रामनगर) गावामध्ये शनिवारी हा प्रकार घडला.

गावात लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच लसीकरण करुन घ्यायचं नसल्याने गावकरी नदीकिनारी जाऊन बसले आणि आरोग्य पथकातील सदस्यांना नदीत उडी मारण्याची धमकी देऊ लागले. त्याचवेळी या गावामध्ये पहाणी करण्यासाठी एसडीएम राजीव कुमार शुक्ला पोहचले. स्थानिकांना समजावण्यासाठी ते नोडल अधिकारी सौरभ त्रिपाठी आणि आरोग्य विभागाच्या टीमसहीत नदीच्या किनारी पोहचले. अधिकारी आणि आरोग्य विभागाचे लोक आपल्याकडे येत असल्याचं पाहून नदी किनारी असणारे काहीजणांनी नदीत उडी मारली. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. पहिल्यांदा हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावले. मात्रनंतर या अधिकाऱ्यांनी लसीचा फायदा आणि ती घेणं का महत्वाचं आहे हे समजवून सांगितलं. लोकांना बराच वेळ समजवाल्यानंतर ते नदीबाहेर आहे. मात्र त्यानंतरही गावातील केवळ १४ जणांनीच लस घेतली.



bottom of page