top of page
Writer's pictureMahannewsonline

18 ते 44 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणासाठी सोलापुरात अनोखे आंदोलन

18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात आज अनोखे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी शहरातील डफरीन चौकात पोस्टरबाजी करत तरुणांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तरुण वर्गाला बसला असून अनेक तरुणांचे जीव देखील गेले. शहरातील अनेक केंद्रावर लस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी देखील लसीकरण सुरू करावे अशी मागणी राज सलगर यांनी केली. प्रशासनाला निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याने लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन केले असून जर लसीकरण सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देखील राज सलगर यांनी दिला.


bottom of page