top of page
Writer's pictureMahannewsonline

‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’!

दिल्ली सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात अनेकांचा मृत्यू झाला, ऑक्सिजन पुरवठा आणि संसर्गाचा वेग कमी झाल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी आता दिल्ली सरकार लसीकरणावर जोर देणार असून त्यादृष्टीने पावलंही उचलली आहेत.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केजरीवाल सरकारने ‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’ म्हणजेच ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, तिथेच नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली. त्यामुळे लस घेण्यासाठी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, त्या मतदान केंद्रावरच जावं, अशी माहिती लोकांना दिली जाणार आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याला लवकरच सुरूवात केली जाईल. पुढील चार आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाईल,” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.


bottom of page