top of page
Writer's pictureMahannewsonline

१२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून होणार सुरुवात

देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे. DCGI कडून यासाठीची परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले, मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासासाठी शाळा पुन्हा सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलं शाळेत जाऊ शकतात. लसीकरणाची गरज नाही. पण ती सुरक्षित असायला हवी. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षेची एक ढाल तयार करणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी याचं लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री करायला हवी.


bottom of page