top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठा समाज तसेच सर्वधर्मीय समाजातील उपवर वधु-वरांची मोफत नावनोंदणी सुरु

15 मेपर्यंत नावनोंदणी करा; नंदकुमार शिंदे यांचे आवाहन

सोलापूर - स्नेहलदेवी बहुउद्देशीय विकास संस्था पुरस्कृत श्री लक्ष्मी नारायण वधु - वर सूचक केंद्र, सोलापूर तर्फे मराठा समाजातील तसेच , सर्व धर्मीय समाजातील डॉक्टर , इंजिनिअर, वकील, उद्योजक , व्यावसायिक , नोकरदार इत्यादी क्षेत्रातील उपवर वधु - वरांची मोफत नावनोंदणी अक्षय तृतीया दिनाचे औचित्य साधून दि 15 मे 2021 पर्यंत करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी इच्छूक वधू वरांनी आपले नाव स्वतःचा बायोडाटा व पोस्टकार्ड साईज फोटोसह केंद्र - संचालिका सौ. अंजली शिंदे, ३०३ दुर्वांकूर आपार्टमेंट दमाणी नगर , सोलापूर येथे सकाळी १० ते ६ या कार्यालयील वेळेत नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे .

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबाराव फुले , यांच्या विचार प्रणाली नुसार घटस्फोटीत , विधवा , विधुर यांचे ही पूर्नवसन करण्याच्या अनुषंगाने त्यांची ही मोफत नाव नोंदणी दि 15/5/2021 पर्यंत करण्यात येणार आहे . राजाराम मोहनरॉय यांनी व त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले व जनजागृती ही केली. या प्रेरणादायची कार्याबद्दल नंदकुमार शिंदे यांना हुतात्मा कुर्बान हुसेन युवक संघ सोलापूर यांच्या वतीने संस्थेस सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे .


सदरच्या पत्रकार परिषदेस संयोजक नंदकुमार शिंदे , केंद्रसंचालिका सौ. अंजली नंदकुमार शिंदे , ऑफिस मॅनेजर कु. प्रज्ञा रोकडे , सहाय्यक मॅनेजर सौ- पूजा घोगरे , प्रसिद्धी प्रमुख निखील भोसले उपस्थितीत होते .


bottom of page