top of page
Writer's pictureMahannewsonline

वर्धा जिल्हयात लॉकडाऊनला पुन्हा मुदत वाढ; 1 जून पर्यंत निर्बंध लागू (जाणून घ्या नवी नियमवाली ... )

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना शहरी भागात केवळ घरपोच सुविधेची परवाणगी

ग्रामीण भागात शिथिलता

वर्धा : जिल्ह्या प्रशासनाने कोविड रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध 18 मे पासून ग्रामीण भागात थोडे शिथिल करत शहरी भागात पूर्वीप्रमाणेच 1 जून सकाळी 7 वाजता पर्यंत वाढवले आहेत. शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती यांच्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळी 7 ते 1 या कालावधीत चालू ठेवता येणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.


शहरी भाग

वर्धा नगर पालिका व लगतच्या मोठ्या 11 ग्रामपंचायती पुलगाव व लगतच्या 2 ग्रामपंचायती, सिंदी रेल्वे ,हिंगणघाट नगर परिषद व लगतच्या 4 ग्रामपंचायती आर्वी, देवळी सेलू, नगरपालिका व समुद्रपूर कारंजा आष्टी या नगरपंचायत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ठरलेल्या दिवशी सकाळी 7 ते 1 पर्यंत घरपोच सेवेसाठी सुरु राहतील

सोमवार- बुधवार -शुक्रवार

सर्व किराणा माल, डेअरी,बेकरी, मिठाई अंडे, मटन, पोल्ट्री, कोंबडी, मासे, पिठाची गिरणी तसेच खाद्य पदार्थाची सर्व दुकाने

मंगळवार,गुरूवार व शनिवार

या दिवशी सर्व भाजीपाला व फळ विक्रेते यांची दुकाने घरपोच सेवा पुरविण्यासाठी सकाळ 7 ते दुपारी 1 वाजपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील.


ग्रामीण भाग

नगरपरिषदेला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती वगळता जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

ग्रामीण भागातील आधार केंद्र शेतकऱ्यांकरिता सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील.


  1. पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी सबंधीत असणा-या साहित्याच्या निगडीत दुकाने सोमवार ते शनिवार फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

  2. गॅस एजन्सी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत राहील.

  3. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी 11 ते रात्री 8

  4. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते 1 1 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहिल

  5. कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी सबंधीत दुकाने.सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याकरीता सुरू राहील. मात्र शेतक-यांना आवश्यक त्या वस्तुचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबधीत कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांची राहील

  6. सार्वजनिक , खाजगी क्रिंडागणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे पुर्णता बंद राहील.

  7. केशकर्तनालय, सलुन, स्पा, ब्युटीपार्लर , शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. तथापी ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.

  8. लग्न समारंभ , स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, , जलतरण तलाव, करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी राहील.

  9. चष्म्याची दुकाने बंद राहिल, मात्र आपातकालीन परिस्थितीत रुग्णांस डोळयांच्या डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याला जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राहील.

  10. नागरी भागातील पेट्रोलपंप सकाळ 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु रुग्णवाहिका, शासकिय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे वाहनाकरीता पेट्रोल डिझेल उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिका-यांची राहिल.

  11. सर्व शासकिय , निमशासकिय, खाजगी कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालयीन वेळेनूसार 15 टक्के क्षमतेने सुरू राहील.

  12. सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट ऑफिस ही कार्यालये नेहमी प्रमाणे सुरू राहतील. बँकांच्या शाखामध्ये गर्दी टाळण्याकरीता योग्य ते नियोजन करण्यात यावे.

  13. सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक , रिक्षा, चारचाकी, व दुचाकी वाहन यांची वाहतुक पुर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

  14. सुरु राहणारे व्यवसाय व संस्था

  15. खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा

  16. मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहील.

  17. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबधित शासकिय, निमशाकिय कार्यालये

  18. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सतुगिरणी सुरू ठेवण्यासाठी केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील.

  19. शासकिय यंत्रणा मार्फत मान्सुपुर्व विकासकामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहिल. यंत्रणांना वेगळया परवाणगीची आवश्यकता राहणार नाही. घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आर. टी. पी. सी. आर. आवश्यक तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई करण्यात येईल.


bottom of page