top of page
Writer's pictureMahannewsonline

धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचाही कोरोनाने मृत्यू

मुंबई : भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. 15 दिवसांपूर्वी तिच्या आईचे कोरोनाने निधन झाले होते. त्या दुखातुन बाहेर पडण्याआधीच तिच्या बहिणीचाही कोरोनाने मृत्यू झालाय. 15 दिवसांत आई आणि बहिणीच्या अकाली मृत्यूने वेदा कृष्णमुर्ती वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

24 एप्रिल रोजी आपल्या आईचं निधन झाल्याचं तिने ट्विट करुन सांगितलं होतं. त्याचवेळी बहीनीलाही कोरोनाची लागण झाल्याने तिची तब्येत खराब असल्याचं तिने म्हटलं होतं. त्या ट्विटला 15 दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. 6 मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमचं सोडून निघून गेल्याचं वेदाने सांगितलंय. वेदाची बहीण 45 वर्षीय वत्सला यांचं निधन चिक्कमंगलुरुच्या एका खाजगी रुग्णालयात झालं. त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र उपचारांना त्या योग्य प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर त्यांची प्राणज्योत बुधवारी रात्री मालवली.


वेदाला क्रिकेटर बनविण्यात तिच्या बहिणीचा मोठा वाटा राहिलाय. तिच्या मुळगावी महिलांना क्रिकेटसाठी संधी नव्हत्या. अशावेळी बंगळुरुला येऊन वेदाला क्रिकेट अकादमीत टाकून तिच्यातील नेतृत्वगुणांना वत्सला यांनी हेरलं. पुढे वेदा भारतीय संघात खेळू लागली. वत्सला यांचं स्वप्न पूर्ण झालं.


bottom of page