top of page
Writer's pictureMahannewsonline

१६ कोटींचं इंजेक्शन दिल्यानंतरही चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू

दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमुकलीचा जीव वाचाविण्यासाठी क्राऊड फंडिंग म्हणजेच लोकवर्गणीमधून तब्बल १६ कोटी रुपये जमविण्यात आले. त्या पैशातून १६ कोटींचं इजेक्शन देण्यात आलं होतं . मात्र त्यानंतर महिन्याभरातच वेदिकाचा मृत्यू झाल्याने पिपंरी-चिंचवडवर शोककळा पसरलीय.

रविवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता वेदिकाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजार झाला. हा आजार आपल्या मुलीला झाल्याचे समजल्यानंतर तिच्या आई वडील सुरुवातीला खचून न जात हिंमतीने हारता वेदिकावरील उपाचारांसाठी पैसे उभे करण्याचं ठरवलं. त्यांनी एक दोन नाही तर तब्बल १६ कोटींचा निधी जमा केला. क्राऊड फंडिंगमधून एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसा गोळा केल्यानंतर वेदिकाला या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं झोलगेन्स्मा नावाचं १६ कोटींचं इंजेक्शन एका खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही या आजाराने वेदिकाचा जीव घेतलाच.


bottom of page