top of page

पालक पनीर

पालक धुवून त्याची पाने खुडून घ्यावी. एका पातेल्यात पाणी करत ठेवावे. पाणी गरम झाले त्यात पालक घालून झाकण न ठेवता उकळी काढावी.२-३ मिनीटांनी सर्व पाणी काढून पालक थोडा थंड होवू द्यावा. थंड झाला कि मिक्सरवर पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी.
पातेल्यात टोमॅटो बुडेल इतपत पाणी गरम करावे. टोमॅटोला हलकेच सालाला चिर द्यावी सोलताना सोपे जाते. पाणी उकळले कि त्यात टोमॅटो २ मिनीटे शिजू द्यावा. नंतर लगेच थंड पाण्यात घालावा यामुळे साल निघायला मदत होईल. साल काढून आतल्या भागाची प्युरी करावी.
पॅनमध्ये २ टेस्पून चमचे तेल गरम करावे. खडा गरम मसाला घालावा. १/२ मिनीट फ्राय करून जिरे घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राउन होईस्तोवर परतावे. नंतर आलेलसूण पेस्ट घालावी. छान वास सुटला कि टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो प्युरी घालून परतावे.
त्यात धणेजिरेपूड, कसूरी मेथी घालावी. त्यात पालकाची पेस्ट, मिठ आणि मिरचीची पेस्ट घालावी.हवे असल्याच किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळा. मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजू द्यावे. १ उकळी काढून पनीरचे ( पनीर ताजे नसेल तर आधी डीप फ्राय करून घ्यावे. ) तुकडे घालावेत. १-२ मिनीटानंतर गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करावे.
Image-empty-state.png
पालक (साधारण २ जुड्या)
ताजे पनीर- १५० ग्राम
बारीक चिरलेला कांदा - १/२ कप
टोमॅटो - १ मध्यम
दही - १ टेबलस्पून
जिरे - १/२ टिस्पून
लसूण पेस्ट - १ टिस्पून
आले पेस्ट - १/२ टिस्पून
हिरव्या मिरच्या - २-३ कुटून
धणेपूड - १ टिस्पून
जिरेपूड - १/२ टिस्पून
कसूरी मेथी - १ टिस्पून
खडा गरम मसाला (१ वेलची, १ तमालपत्र, २ लवंगा, १ लहान काडी दालचिनी).
तेल - ३ टेस्पून
मीठ चवीनुसार

साहित्य 

कृती 

TRP 2.jpg

-

मो. 

bottom of page