top of page
Writer's pictureMahannewsonline

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा हिंगोलीच्या दिशेनं जात असताना अपघात झाला. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.

हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडेच असून त्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन त्या रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं असून सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.

bottom of page