top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : ‘ना हारे थे, ना हारे है ... हम हिंदुस्तानी’... ; बॉलिवूडमधील १५ दिग्गज एकत्र

७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी शुक्रवारीच ‘हम हिंदुस्तानी’ हे गाणं रिलीज करण्यात आलंय. ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील तब्बल १३ दिग्गजांनी गायलेल्या या गाण्यानं तरुणाईचा उत्साह आणि देशाभिमानाची भावना दुपटीने वाढवलीय

‘धमाका रेकॉर्ड्स’च्या या गाण्याला सोनू निगम, कैलाश खेर, अलका याग्निक, शब्बीर कुमार, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुति हसन, पद्मिनी कोल्हापुरे, अनिल अग्रवाल, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबैर यांनी आपला सुरेल आवाज दिलाय.

प्रियांका शर्मा आणि पारस मेहता यांच्या ‘धमाका रेकॉर्ड्स’चं हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्याने तब्बल १२ लाख व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. कोरोनासारख्या कठिण काळातून लवकरच बाहेर पडू आणि पुन्हा पहिल्यासारखं जगात वावरू शकतो, असा विश्वासं या गाण्यातून व्यक्त करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दररोज नवीन रूग्ण सापडतच आहेत. या कठिण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान काम करणाऱ्या योद्दांना सन्मानित करण्यासाठी ‘धमाका रेकॉर्ड्स’ने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. कोरोनाविरोधातील लढाईत सर्व भारतीयांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करताना दिसून आले. यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लोकांमध्ये देशभक्तीप्रमाणेच नव्या आशेचा किरण देणं गरजेचं आहे. म्हणून ‘धमाका रेकॉर्ड्स’ने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना एकत्र करत हे गाण सादर केलंय. वेदांता ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशनने या गाण्यासाठी सहकार्य केलं आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक दिलशाद शब्बीर शेख तर गीतकार-संगीतकार कशीश कुमार आणि मोहित बिटलब यांनी केलंय.


bottom of page