top of page
Writer's pictureMahannewsonline

Video: …अन् अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचं इंजिन बंद पडलं. चालकानं इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी जवळच असलेली बोट बोलावण्यात आली. त्यानंतर अजित पवार दुसऱ्या बोटीतून पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या कासारसाई धरण असून तेथे बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. मत्स्य व्यवसायाची पाहणी तसेच माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी लवकरच धरणावर पोहोचले. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. तिथं जाण्यासाठी तराफ्यावर जायचं नियोजन होतं. त्यानुसार अजित पवार तराफ्यावर बसून धरणाची पाहणी करण्यासाठी गेले. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तराफ्याचं इंजिन अचानक बंद पडलं.

अजित पवार यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

सुरुवातीलाच अजित पवारांनी गरजेपेक्षा जास्तीचे लोक जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका, अशी सूचना केली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.


bottom of page