top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : बैलाचा महिलेवर हल्ला...लोकांनाही न जुमानता... तुडव तुडव तुडवलं

अहमदाबाद : बैल हा पाळीव प्राणी असला तरी तो चवताळला तर काय होऊ शकते हे याची प्रचिती नुकतीच आली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये एका बैलाने महिलेवर हल्ला केला आहे. आणि बैलाने महिलेला आपल्या पायांखाली अक्षरशः तुडव तुडव तुडवलं आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येईल. लोकांनाही न जुमानता बैल महिलेला तुडवत राहतो. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्त्याने जात होती. तेव्हा तिला समोर बैल दिसतो. आणि तो आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे तिला समजलं. त्यामुळे ती तिथून माघारी वळते. परंतु, बैल तिच्यामागे पळत जाऊन तिच्यावर हल्ला केल्याचे दिसते. ज्या जागेवरून महिला पळत गेली तिथंच त्या बैलाने तिला मारत परत आणलं. सुरुवातीला तो तिला आपल्या शिंगांनी आणि नंतर पायांनी मारताना दिसतो आहे. भिंतीच्या कडेला एक बाईक उभी आहे, त्या बाईकच्या जवळ भिंतीच्या कडेला बैल तिला मारत नेतो. त्यानंतर तो तिला तसंच मारत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो.

महिला जीवाच्या आकांताने ओरडते. मदतीसाठी याचना करते. तिचा आरडाओरडा ऐकून एक तरुणी तिथं धावत येते. ती त्या महिलेला बैलाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. पण बैल तिलासुद्धा ढकलून देतो. महिलेला वाचवण्याचा तरुणीचा प्रयत्न कितीतरी वेळा अपयशी होतो. शेवटी ती कुणालातरी बोलवण्यासाठी जाते. इतक्यात तिथं काही आणखी लोक जमा होतात. लोक त्या बैलाला मारून त्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न करतात. पण बैल इतक्या माणसांनाही घाबरत नाही तो महिलेला काही सोडत नाही. शेवटी तिथून गेलेली एक तरुणी आणखी काही माणसांना आणते आणि हातात एक काठी घेऊन येते. ज्याने ती बैलाला मारून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते.


कसंबसं करून महिलेला त्या बैलाच्या तावडीतून सोडवलं जातं. सादर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

bottom of page