top of page
Writer's pictureMahannewsonline

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाची झुंज देते होते. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. आज शनिवारी सकाळी विजय कदम यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




देखणी बायको नाम्याची, पोलीस लाईन, हळद रुसली कुंकू हसलं, चष्मेबहाद्दर, सासू नंबरी जावई दस नंबरी या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी भिकाजीराव करोडपती, ती परत आलीये आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी सारख्या मालिकेतही त्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. ‘टूरटूर’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांतून त्यांनी काम केले होते.



Recent Posts

See All
bottom of page